पिंपरी : रस्त्यावरील कार चोरट्यांनी चोरली दरम्यान गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करुन चोरट्यांना अडवले. त्यावेळी चोरट्यांनी पोलिसांवर चाकू हल्ला केला. यामध्ये पोलीस किरकोळ जखमी झाले. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास निगडी – देहूरोड रस्त्यावर घडली.
यमुनानगर परिसरातून चोरट्यांनी कार चोरली. दरम्यान गस्तीवर असणारे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड निगडीच्या दिशेने निघाले होते. पोलीस गाडी पाहून तक्रारदार त्यांच्याकडे आला आणि कार चोरीला गेल्याचे सांगितले. जोगदंड आणि त्यांच्या सोबत असणारे पोलीस भक्ती – शक्ती चौकातुन जात असताना चोरीला गेलेली कार दिसली. पोलिसांनी पाठलाग सुरु केला. दरम्यान पोलिसांनी गाडी आडवी लावली. खाली उतरून निरीक्षक जोगदंड यांनी चावी काढण्यासाठी दरवाजाच्या खिडकीतून हात घातला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या हातावर मारहाण केली. चोरट्यांनी त्यांच्याकडील तलवार आणि चाकूने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.
दरम्यान दोन्ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. आयुक्तांनी घटनास्थळी देखील पाहणी केली आणि अज्ञात आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश दिले.