मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत एक-एक मताला किंमत आली असून ती आपल्याकडे यावीत यासाठी दोन्हीकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन विकास आघाडीच्या हिंतेंद्र ठाकुर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे तीन मतं आहेत. ही मतं आता निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपकडून ठाकुर यांची मनधरणी सुरू आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हितेंद्र ठाकुर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यानी दिली आहे. या दोन नेत्यांमध्ये दोन मिनीटांची चर्चा झाली असून ती सकारात्मक झाल्याची माहिती आहे.



