नवी दिल्ली : राज्यसभेच्या 16 जागांसाठी शुक्रवारी मतदान झालं. मतमोजणीनंतर कर्नाटकात भाजपला तीन तर काँग्रेसला एक जागा मिळाली. राजस्थानात काँग्रेसला तीन तर भाजपला एक जागा मिळाली. हरियाणात भाजपचे कृष्णलाल पनवार आणि भाजप-जेजेपी समर्थित उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जिंकली. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना विजय मिळाला. काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. मात्र, शिवसेनेच्या संजय पवारांचा निवडणुकीत पराभव झाला.
महाराष्ट्र : राज्यसभा निवडणुकीबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे की, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. पियुष गोयल यांना सर्वाधिक 48 मतं, अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली आहेत. आमचा तिसरा उमेदवारही शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन निवडणून आलाय. आज भाजपची ताकद बघायला मिळाली.” दरम्यान, काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढ़ी म्हणाले, “शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत मी विजयी झालोय. मी सर्व आमदारांचं आभार मानतो. परंतु, महाविकास आघाडीचे चौथे उमेदवार संजय पवार विजयी होऊ शकले नाहीत याचं आम्हाला दुःख आहे.
कर्नाटकात भाजपच किंग
कर्नाटकात झालेल्या राज्यसभेच्या चार जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे तीन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आलाय. भाजपच्या वतीनं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या निवडणूक लढवत होत्या, त्यांना पहिल्या पसंतीची 46 मतं मिळाली. तर काँग्रेसचे जयराम रमेशही निवडून आले आहेत. 4 पैकी 3 ठिकाणी भाजपची बाजी, एका जागेवर काँग्रेस कर्नाटकातील विजयी उमेदवारनिर्मला सीतारमण – भाजप 46 मतंजग्गेश- भाजप 46 मतंलहर सिंह सिरोया- भाजप 33 मतंजयराम रमेश- काँग्रेस 46 मतंक्रॉस वोटिंगमुळं जेडीएसचं नुकसान
हरियाणात कोण जिंकले.?
हरियाणात भाजपचे कृष्ण पाल पंवार आणि भाजप-जेजेपी समर्थित कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जिंकलीय. दुसऱ्या जागेसाठी पुन्हा मतमोजणी करून कार्तिकेय विजयी झाले. तर, काँग्रेसच्या अजय माकन यांचा फेरमतमोजणीत पराभव झालाय. त्यांचं एक मत फेरमोजणीत रद्द झालंय. हरियाणातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी झाली. काँग्रेसच्या किरण चौधरी आणि बीबी बत्रा यांनी मतांबाबत निवडणूक आयोगाकडं तक्रारी पाठवली होती.2 पैकी 1-1, भाजप आणि काँग्रेस भाजप – कृष्ण पाल पंवार- 31अपक्ष – कार्तिकेय शर्मा -काँग्रेस – अजय माकन- पराभूत
राजस्थानमध्ये काँग्रेसच सरस, 4 पैकी 3 जागा जिंकल्या :
राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसनं 4 पैकी 3 जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिलाय. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळालाय. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. कोणाला किती मतं मिळाली? रणदीप सुरजेवाला यांना 43 मतं मिळाली.मुकुल वासनिक यांना 42 मतं मिळाली.घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली.प्रमोद तिवारी यांना 41 मतं मिळाली.डॉ. सुभाष चंद्रा यांना 30 मतं मिळाली.