कोल्हापूर : नुकतेच झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकीत कोल्हापूरचे भाजप उमेदवार धनंजय महाजिक यांनी विजय मिळवला आहे, या विजयानंतर आज त्यांचे कोल्हापूरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार महाडिक यांच्या स्वागतासाठी संपूर्ण महाडिक कुटुंबिय एकत्र आले होते.
दरम्यान राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर आज खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरला परतले. तेव्हा सर्वप्रथम शिरोली येथे जाऊन त्यांनी काका महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. यावेळी धनंजय महाडिक यांना अश्रू अनावर झाले. हा क्षण संपूर्ण महाडिक कुटुंब आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अतिशय भावनिक असा होता.
दरम्यान आज धनंजय महाडिक पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, पुरेसं संख्याबळ असल्यानेच मला उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे घोडेबाजार करण्याचा मुद्दा येत नाहीत. आमदार काही विकावू नाहीत. राज्यसभेला गुप्त मतदान पद्धत नसतानाही भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. विधानपरिषद निवडणुकीवरूनही महाविकास आघाडी सरकारला जाहीर इशारा दिला.


