मुंबई : सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा मिळालेला नाही. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला शेवटचा अर्धा तास शिल्लक असतानाही सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती.
- नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारला
आपल्याला मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीला कोणताही दिलासा मिळाला नसून नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे.
आपल्याला मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीला कोणताही दिलासा मिळाला नसून नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. k


