राजस्थानच्या पाली जिल्ह्यात कुमावत समाजातील पंचांनी लग्नासाठी आश्चर्यकारक नियम जारी केले आहेत. यामध्ये वराच्या दाढीबाबत दिलेल्या फर्मानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतल आहे.
जिल्ह्यातील 19 गावांच्या लोकप्रतिनिधींनी एका बैठकीत नवीन नियमांचा ठराव संमत केला असून, त्यानुसार गावातील कोणत्याही कुटुंबातील विवाह विधींमध्ये वराला क्लीन शेव्ह करणं बंधनकारक असणार आहे.प्रस्तावानुसार, वर दाढी करून लग्नाला बसला तर त्याला सात फेऱ्या मारता येणार आहेत.
पालीतील जुन्या बसस्थानक परिसरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. बैठकीत समाजातील लोकांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं की, विवाह हा संस्कार असून त्याचं पालन करणं आवश्यक आहे. विवाह सोहळ्यात वरालाच राजा म्हणून पाहिलं जातं, त्यामुळं दाढी वाढवून विधी करणं कितपत योग्य आहे? असा सवालही यानिमित्तानं करण्यात आला. लग्नात आम्हाला फॅशनची कोणतीही अडचण नाही. मात्र, दाढी वाढवून लग्न करणं समाजाला मान्य होणार नाहीय




