मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार हे त्यांच्याच पक्षातील शिवसैनिक आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी अडचणीत आणलं आहे. काही वेळापूर्वीच जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी आजच वर्षा बंगला सोडत असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा काही तासातच खरी ठरली आहे. त्यांनी सर्व साहित्यासह वर्षा बंगला सोडला आहे. यावेळी अनेक शिवसैनिक गाड्यांच्या आडवे झोपत असल्याने पोलिसांची मात्र पुरती तारांबळ उडाली होती.

वर्षा बंगला सोडताना शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. आपले लाडके नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवासस्थान सोडल्याने अनेक शिवसैनिक नाराज झाले. ते त्यांच्या मातोश्री या निवसस्थानीच आता मुक्कामी असणार आहेत. तर मला कुठल्याही आमदाराने मी मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्यास सक्षम नसल्याचे सांगावे, मी एका मिनिटात राजीनामा देईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले होते. तसेच मुख्यमंत्री बोलून गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या चार मागण्या थेट ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या होत्या. यातून तर मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात कुठेही मेळ लागला नाही.
CM Uddhav Thackeray ji speaking live https://t.co/c5A1MZSHQs
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 22, 2022
मुख्यमंत्री त्यांचं साहित्य बाहेर काढतानाचे काही फोटोही समोर आले आहेत. यावेळी शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली होती. आम्ही काहीही झालं तरी मुख्यमंत्र्यांबोत आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांनी दिली आहे.



