मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडून बाहेर आले, तेव्हा बाहेर उभे असलेल्या शिवसैनिकांकडून त्यांच्या पुष्पवृष्टी करण्यात आली. लाखो शिवसैनिकांसाही हा क्षण हा भावनिक होता. यावेळी मुख्यमंत्री यांनी हात जोडत लोकांचे आभार मानले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही सुरू होती. शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याने मुख्यमंत्र्यांची गाडी या गर्दीतून वाट काढत हळू हळू पुढे सरकार होती. यावेळी पोलीस शिवसैनिकाना हटवण्याचे काम करत होते. मात्र शिवसैनिकही तरीही मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पुष्पवर्षाव हे करतच होते.
CM Uddhav Thackeray ji speaking live https://t.co/c5A1MZSHQs
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 22, 2022
काही वेळापूर्वीच जनतेला संबोधन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी आजच वर्षा बंगला सोडत असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा काही तासातच खरी ठरली आहे. त्यांनी सर्व साहित्यासह वर्षा बंगला सोडला आहे. ते त्यांच्या मातोश्री या निवसस्थानीच आता मुक्कामी असणार आहेत. तर मला कुठल्याही आमदाराने मी मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्यास सक्षम नसल्याचे सांगावे, मी एका मिनिटात राजीनामा देईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले होते. तसेच मुख्यमंत्री बोलून गेल्यानंंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या चार मागण्या थेट ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या होत्या. यातून तर मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात कुठेही मेळ होताना दिसत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदही सोडणार का? असाही सवाल आता विचारण्यात येत आहे.



