बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या १२ वी तसेच श्री मोहनलाल सोनी विद्यालयाबरोबरच संस्थेच्या आदगाव,मेंदडी व भरडखोल शाळेतील दहावीत उत्तीर्ण झालेल्या १ ते ३ क्रमाकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सोमवार दि.२७ जून रोजी संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला
यावेळी संस्थेचे विश्वस्त रविंद्र कुलकर्णी यांनी आपल्या जवळपास असलेल्या दिघी पोर्ट तसेच रोहा,विळे भागाड येथील औद्योगिक संस्थांच्या प्रकल्पासाठी अपेक्षित असलेले शिक्षण घेतलं तर भविष्यात या प्रकल्पात नोकरी मिळण्यासाठी संधी असल्याचे सांगताना सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे कार्याध्यक्ष सुकुमार तोंडलेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक करताना सांगितलं की, विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीवर हे यश प्राप्त केले आहे.यशाचे सातत्य टिकवण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी कष्ट व चिकाटीची आवश्यकता आहे.आपण कीतीही मोठे झालो तरी आपल्या शाळेचे ॠण विसरु नका त्याचबरोबर शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी गैरहजर असलेले संस्थेचे पदाधिकारी व पालक याबद्दल खंत व्यक्त केली.आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक अमित पाटील यांनी केलं.याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे सदस्य श्रीराम तोडणकर,प्राचार्य जालींदर पोटे शाळेचे शिक्षक,उत्तीर्ण विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
———————————–
जनता शिक्षण संस्था बोर्लीपंचतन संचालित विद्यालयांचे उत्तीर्ण विद्यार्थी
नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्लीपंचतन इयत्ता-१२वी
- प्रथम-आदिनाथ पांडुरंग निगुडकर (विज्ञान शाखा)- ७६.१७%
- द्वितीय-सायली संतोष बांदे (विज्ञान शाखा) -७३%
- तृतीय-कुमारी प्रांजल प्रमोद रीळकर (वाणिज्य शाखा)-७२.८३%
————————————-
श्री मोहनलाल सोनी विद्यालय इयत्ता १०वी
- प्रथम- श्रुती बाबासाहेब यळमंते-९४.८०%
- द्वितीय-सुजल मकरंद जाधव-९४.६०%
- तृतीय-पार्थ रविंद्र दिवेकर-९३.६०%
———————————–
आदगाव हायस्कूल आदगांव
- प्रथम-मोहिनी मंगेश मांडवकर -७४.८०%
- द्वितीय-हर्षदा रामचंद्र पाटील-७३.८०%
- तृतीय-निहार नंदकिशोर भाटकर-७०.८०%
———————————–
न्यू इंग्लिश स्कूल भरडखोल
- निलम नारायण चोगले व कल्याणी नारायण खोपटकर यांनी ८०.६०% मार्क मिळवून संयुक्त प्रथम,
- द्वितीय-मयुर पांडुरंग खोपटकर-७९.४०%
- तृतीय-अंजली सुनिल ठोंबरे- ७८.४०%
———————————
मेंदडी हायस्कूल मेंदडी
- प्रथम-अर्पिता लक्ष्मण पाटील-८६.८०%
- द्वितीय- छकुली संजय पायकोळी- ७८%
- तृतीय-नेत्रा हरिश्चंद्र पायकोळी-७५.४०%
——————————-
फातीमाबीबी ओस्मान मुर्तुजा इंग्लिश मिडीयम स्कूल
- प्रथम-सुकृत विलास भायदे-८०.८०%
- द्वितीय-हर्ष प्रशांत पडवेकर-७०.८०%
- तृतीय-अलीना शफिक घराडे-६९.६०%



