पुणे: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या ३९ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे गटाकडे विलिनीकरणाची वेळ आली, तर मनसेचा पर्यायाकडे सकारात्मकतेने पाहिले जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, हीच ती वेळ आहे असं मत रुपाली पाटील- ठोंबरे यांनी व्यक्त केलं आहे.




