वालचंदनगर – जगत््गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज बुधवार (ता. २९) रोजी इंदापूर तालुक्यामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी साडेचार वाजता संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्यामध्ये दाखल झाला.
शेरपुलावरुन पालखी इंदापूर तालुक्यात प्रवेश करताच ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करण्यात आला. पालखी सोहळ्या सोबतच्या लाखो वैष्णवांच्या साक्षीने इंदापूर तालुक्यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दोन वर्षानंतर पालखी सोहळा भवानीनगरमध्ये आल्यानंतर नागरिकांनी भक्तीभावाने पालखीचे स्वागत केले. पालखी रथावरती पुष्पांची उधळण करण्यात आली.
भवानीनगरमध्ये पालखी सोहळा येतामध्ये श्री छत्रपती भवानीनगरमधील श्री छत्रपती मुलींच्या हायस्कुलमधील मुलींनी स्वागत करुन कारखाना स्थळावर पालखी सोहळा विसावला. भवानीनगर, सपकळवाडी, लाकडी, निंबोडी परीसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी सोहळ्यातील वैष्णवांची कारखान्याच्या वतीने वारकऱ्यांची सोय केली.




