मुंबई : एकनाथ शिंदे यांची बंडाळी, त्यांना मिळालेली तब्बल 50 पेक्षा अधिक आमदारांची साथ, सर्वोच्च न्यायालयानं दिलेला विरोधातील निकाल, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा 1 जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्याच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील सत्तेचं वाटप कसं असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



