पिंपरी :- राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अशी कोणतीही भेट झाली नसली तर खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये…..#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022
एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. याचीच सुरुवात त्यांनी शरद पवारांपासून केल्याचं वृत्त माध्यमातून आले. मात्र सदरचा फोटो हा मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगत या वृत्ताचे खंडन केले.
शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकीत केले होते. याकडे सर्व राज्याचे लक्ष वेधण्यात आले. अशावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, आमची हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून नैसर्गिक युती आहे. या सरकारला अडीच वर्षे कोणताही धोका नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलदार व मोठ्या मनाचे आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्री पद मिळाले. आमच्यामध्ये चांगला समन्वय असून मतभेद होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आमच्या सरकारमागे भक्कमपणे उभे असल्याने सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला होता. आणि अशा दरम्यान शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चालतात उधाण आले होते यावरती शिंदे यांच्याकडून पडदा पाडण्यात आला.



