मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अडसूळ यांनी पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात पक्षाबाबत खंत व्यक्त केली आहे.
अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ईडीने केलेल्या कारवाईवेळी आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजीनाम्यानंतर अडसूळ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर अडसूळ यांचा मुलगा अभिजीत हा आधीपासूनच शिंदे गटासोबत आहे. या घटनेनंतर आमदारांबरोबर खासदारांचीही शिवसेना पक्षातून गळती सुरू झाल्याचं उघड झालं आहे.



