मुंबई : DHFL घोटाळा प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई केली असून या घोटाळ्याशी संबंधीत कारवाईत अंडरवल्डचा हस्तक अजय नवंदर याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
अजय नवंदर हा अंडरवल्डचा हस्तक असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. डिएचएफएल प्रकरणात ही करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील पैसे नवंदर यांनी छोटा शकिल आणि दाऊदला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान भविष्यात या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन देखील शोधण्याचा प्रयत्न CBI करणार आहे. दरम्यान ३५ हजारा कोटींच्या घोटाळ्यातील पैसे अजय नवंदर याने देशाबाहेर पाठवल्याचा संशय आहे. हा पैसा दाऊद आणि शकील यांना पाठवल्याचे सांगितले जात आहे.
नवंदर याने भारताबाहेर पाठवलेला हा पैसा भारताविरोधातील कारवायांसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान DHFL घोटाळ्याच्या अंडरवल्ड कनेक्शनचा सीबीआय शोध घेत आहे. आज दुपारी अजय नवंदरला अटक करण्यात आली आहे. दरम्यान नवंदर हे काही राजकीय नेत्यांच्या जवळचे असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



