पुणे – पुणे-सोलापूर रस्त्यावरील कोरेगाव मूळ येथील १३ एकर जमिनीचा लिलाव करण्यात आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने लिलावात ६० कोटी ४१ लाख ७४ हजार रुपयांना १३ एकर जमीन खरेदी केली आहे.
शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. या जमिनीचा लिलाव करण्यात आला. यामध्ये बाजार समितीने ही जमीन विकत घेतली आहे. शहराचा विस्तार वाढत असून प्रस्तावित वर्तुळाकर मार्ग, शेतकरी आणि बाजार घटकांच्या दृष्टीने सोयस्कर असा उपबाजार बांधण्याचे निश्चित करण्यात आले.
अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या बाजार आवार उपलब्ध असल्यास शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. त्यादृष्टीने बाजार समितीकडून जमिनीची पाहणी करण्यात येत होती, असे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी नमूद केले.




