मुंबई : शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम आक्रमक झाले असून उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. आपण उद्यापासून एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी आजुबाजूला अनिल परब यांच्यासारखे जे लोक बसले आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्यावं असा सल्लाही दिला आहे.
मी उद्यापासून एकनाथ शिंदेंसोबत जाणार, सभा, बैठका घेणार पण कोणालाही मातोश्रीवर बोलू देणार नाही, उद्धव ठाकरेंवर टीका करु देणार नाही. जे शरद पवार, अजित पवार यांना हवं आहे ते होऊ देणार नाही,” असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आजुबाजूला अनिल परब यांच्यासारखे जे लोक बसले आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्यावं. शिवसेना पूर्ण संपण्याची वाट पाहू नका असा सल्लाही त्यांनी दिला.



