मुंबई : आमच्या सोबत आलेल्या चाळीस व अपक्ष 10 असे ५० आमदार मधील एकही आमदार पुढील निवडणुकीत पडणार नाही अशी गर्जना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली. यावर आमदार रोहितदादा पवार म्हणाले की, नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांना मनोबळ द्यावेच लागते. एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. ते निश्चितच कार्यकर्त्यांना मनोबल देतात. खाली समीकरण कसे आहे हे निवडणूक आल्यावरच स्पष्ट होते, असे रोहितदादा पवार यांनी सांगितले.
पुढे म्हणाले की, मागील 50 ते 55 वर्षांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात बोलल्या शिवाय महाराष्ट्रात काही राजकारण झाले आहे का? काही झाले तरी शरद पवारसाहेबावरच बोलायचे. ट्रक भरून पुरावा घेऊन निघालेल्यांचा ट्रक अजूनही पोचलेला नाही. शरद पवारसाहेब नुसते हलके हसले, हसले नाहीत, तिकडे पाहिले, वर पाहिले तरी त्याच्या बातम्या होतात. शेवटी शरद पवारसाहेब यांच्या मनात काय. शेवटी ते एवढे मोठे राजकारणी आहेत की, त्यांनी काही केले, महाराष्ट्रात काहीही घडले तरी ते त्यांच्या मुळेच घडले असेच सर्वांना वाटते.
शिंदे गटाला ठाकरे यांच्या विरोधात बोलून चालणार नाही. शेवटी ही स्टॅटर्जी असू शकते. शिवसैनिक हा नाराज होईल. खापर कोणावर फोडायचे तर नेहमीचेच पवार साहेब आहेतच. शरद पवारसाहेब व अजितदादा पवारांवर खापर फोडले तर विषय सोपे होतील असे त्यांना वाटत असावे. राज्यातील घटनाक्रमावर अनेकजण तर्कवितर्क लढवतील. मात्र, जे दिसते तेच खरे आहे, असे मत रोहितदादांनी व्यक्त केले.
मी लंडनला गेलो तरी हेच कपडे घालतो. अमेरिकेला अजून गेलो नाही मात्र गेलो तरी हेच कपडे घालेल. मतदारसंघातही हेच कपडे घालतो. अनेकांनी सांगितले कुडता पायजामा घालायचा. पांढरे कपडे घालायचे. स्वच्छ प्रतिमा दिसते. मी म्हणालो स्वच्छ प्रतिमा दाखवायला मला पांढरे कपडे घालायची गरज नाही. कारण आजचा युवा असा आहे. मी त्यांचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे लोकांना माझी स्टाईल आपलीशी वाटत असेल, असे मत रोहितदादानी व्यक्त केले.



