भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसाठी दिल्लीतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहे.
#WATCH PM Modi takes part in Mukhyamantri Parishad meeting at BJP headquarters in Delhi pic.twitter.com/SGQnG9RKp2
— ANI (@ANI) July 24, 2022
या परिषदेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहिल्याने नव्या प्रश्नांची सुरुवात झाली. कारण राज्यात भाजपचा मुख्यमंत्री नाही. तर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आहेत. असे असताना आणि मुख्यमंत्री परिषद असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती वेगळी घटना सांगून जात आहे.



