पुणे. 26 जुलै : आज आनंद विद्यानिकेतन प्रशालेमध्ये राऊंड टेबल फाउंडेशन व स्फेरुल यांच्या संयुक्त विद्यमाने राऊंड टेबलचे प्रतिनिधी मा. सुमित गुप्ता व निमित जलाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्फेरुल फाउंडेशनच्या समन्वयक रूपाली शिंदे, अमृता शिर्के व श्रद्धा ननावरे उपस्थित होत्या.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच महिला शिक्षिका व स्फेरुल फाउंडेशन चे समन्वयक या सर्वाच्याच हस्ते प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या प्रांगणामध्ये विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपणाच्या पार्श्वभूमीवर स्पेरुल फाऊंडेशन च्या श्रद्धा ननावरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जाणीव जागृती होण्यासाठी Ozone Depletion या विषयावर कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणात ओझोन थराचे महत्त्व पटवून देऊन जागृती करून दिली.
यावेळी प्राथमिकचे मुख्याध्यापक सतिश पाटील, मुख्याध्यापक लक्ष्मण मासाळ व दोन्ही प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्फेरुल फाऊंडेशन च्या रुपाली शिंदे, अमृता शिर्के व श्रद्धा ननावरे यांनी विशेष परिश्रम घेतले.




