पुणे – भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
26 JulThunderstorm warnings in state for next 3 days pic.twitter.com/fS3EkDcGAa
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 26, 2022
गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मात्र गेल्या तीन-चार दिवसांत पावसानं उसंत घेतली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या १८ जिल्ह्यांना पिवळा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतचं ट्वीट केलं आहे.



