मुंबई : प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील आमदारांचं प्रगती पुस्तक जारी केलं आहे. गुणांमध्ये काँग्रेस आमदार अमिन पटेल पहिल्या क्रमांकावर, भाजपचे पराग अळवणी दुसऱ्या, तर शिवसेनेचे सुनील प्रभू तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि प्रकाश सुर्वे, भाजपचे मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर या आमदारांना सर्वात कमी गुण मिळाले आहेत.
प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील आमदारांचं मागील दोन वर्षांत केलेले काम, विधानसभा सभागृहात मांडलेले प्रश्न यावर आधारित प्रगतीपुस्तक समोर आणलं आहे. हिवाळी अधिवेशन 2019 ते पावसाळी अधिवेशन 2021 या कालावधीचा हे प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं आहे. यामध्ये 31 आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील जनतेचे उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या संदर्भात हे प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं आहे. यात पाच मंत्र्यांना वगळण्यात आलेलं आहे.



