मुंबई : मुंबई विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला अखेर स्वांतत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला अखेर मंजूरी देण्यात आली आहे. यासंबंधीच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या होत्या. काही विद्यार्थी संघटनेच्या मागणीनंतर वस्तिगृहाला शाहू महारांचे नाव द्यायचे की सावरकरांचे यावरून वाद रंगला होता.
विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. वसतिगृहाला सावरकरांचं नव्हे तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात यावं अशी विद्यार्थी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या नामकरणावरून हा नवीन वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी झालेल्या या वसतिगृहाला उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची सूचना केली होती. त्यानंतरा छात्रभारती तसेच इतर विद्यार्थी संघटनांनी या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याचे पत्र कुलगुरूंना दिले होते.



