पुणे : कोरोना नंतरच पहिल्यांदाच नियमनमुक्त रखीपोर्णिमा सन हा दहा दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे बाजारात राख्यांची रेलचेल सुरू आहे. यामध्ये राख्यांचे बरेच प्रकार पाहायला मिळत आहेत. नागरीक मोठ्या संख्येने बाजारात खरेदीसाठी येत आहेत.
फॅन्सी, पेंडत, स्टोन, झरदोजी, लुंबा, डोरी राखी हे राख्यांचे प्रकार पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर किड्स, पर्यावरण पूरक सीड राखी व कपल राखी (भैय्या भाभी) अशा अनेक प्रकारच्या राखी आहेत. कोरोनाच्या नंतर दोन वर्षानी हा सण उत्साहात साजरा होत असताना ग्राहक आपल्या पसंतीची राखी खरेदी करण्यासाठी येत आहेत. यामध्ये स्पंज राखीला ज्येष्ठ नागरिक पसंती देत आहेत तर फॅन्सी राख्यांना तरुणाई पसंती देत आहे.
हिंदू धर्मातील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भाऊ-बहीण या सणची वाट पाहात असतात. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधते मात्र सद्या बाजारात ग्राहकांना राखी आकर्षित करीत असली तरी त्या तुलनेने बाजारात राख्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
मात्र ग्राहकांची मागणी वाढत आहे. दूरगावी असलेल्या बांधवाला पाठवायची हवी तशी राखी कुठे मिळेल या शोधात समस्त भगिणी असताना बाजारात राख्यांची संख्या कमी असलेली दिसते. रक्षाबंधन तोंडावर आले असताना बाजारात अपेक्षित प्रमाणात राखी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे राखीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे




