मुंबई : गेल्या एक महिन्यापूर्वी राज्यात ठाकरे सरकार पडून शिंदे-फडणवीस सरकार आलं यावेळी बरेच राजकीय नाट्य घडलं. मात्र हे राजकीय नाट्य राजकारणाापुरते मर्यादित राहिलं नाही. तर हा वाद थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवा. हे सरकार बेकायदेशीररित्या अस्तित्वात आलं आहे.
तसेच शिवसेनाही ठाकरेंची आहे आणि धनुष्यबाण हा आमचाच आहे, असे म्हणत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचला. ठाकरे गटाकडून शिंदे विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिके वरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला. कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी उद्या तीन ऑगस्ट वरती दिली गेली. आता उद्या शिंदे सरकारचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे.



