मुंबई : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी 75 हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तत्काळ मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली.



