मुंबई : गेल्या एक महिन्यापूर्वी राज्यात ठाकरे सरकार पडून शिंदे-फडणवीस सरकार आलं यावेळी बरेच राजकीय नाट्य घडलं. मात्र हे राजकीय नाट्य राजकारणाापुरते मर्यादित राहिलं नाही. तर हा वाद थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवा. हे सरकार बेकायदेशीररित्या अस्तित्वात आलं आहे. यावर काल व आज सुप्रीम कोर्ट झालेल्या सुनावणीत दोन्हीही बाजूंच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर पुढील सुनावणी आठ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाने सलग दोन दिवस सुनावणी ठेवली होती. आज सकाळी प्रथम सत्रात यावरती काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे राज्यातील राजकारणात वेगळी समीकरणे तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र आजच्या चर्चेनंतर ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त पुढे ढकलला गेला आहे.
तसेच शिवसेनाही ठाकरेंची आहे आणि धनुष्यबाण हा आमचाच आहे, असे म्हणत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचला. ठाकरे गटाकडून शिंदे विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिके वरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला. कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी उद्या ५ ऑगस्ट वरती दिली गेली. आता ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे शिंदे सरकारचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे.



