मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून विदर्भात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुन्हा पूरस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. वर्धा जिल्ह्यातील अनेक मार्ग ठप्प पडले असून काही ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आलापल्ली – भामरागड रस्ता बंद तर पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. कुमरगुडा नाला आलापल्ली – भामरागड मार्ग देखील पूर्णपणे बंद झाला आहे.



