महाराष्ट्र माझा, १० ऑगस्ट
राज्यातील सत्ता नाट्य नंतर मागील 39 दिवसापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर काल संपन्न झाला. यामध्ये शिंदे गट व भाजप मधील प्रत्येकी ९ मंत्र्यांना शपथविधी देण्यात आला. त्यानंतर कोणते खाते कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती त्याची अंतिम यादी समोर आले आहे.
यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुणाला कोणतं खातं मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याची संपूर्ण यादी समोर आली आहे. यामध्ये शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपदासह 12 खाती देण्यात आली आहेत. तर भाजपकडे उपमुख्यमंत्रीपदासह 14 खाती आहेत.
भाजपकडे कोणती खाती?
उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, महसूल, सहकार, ऊर्जा, वन, सार्वजनिक बांधकाम , आदिवासी, जलसंपदा, सामाजिक न्याय , गृह निर्माण, आरोग्य आणि विधी व न्याय
शिंदे गटाकडे कोणती खाती?
मुख्यमंत्री, नगर विकास विभाग, पाणी पुरवठा, कृषी, ग्राम विकास , रोजगार हमी, उद्योग, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्य विभाग, पर्यटन व पर्यावरण आणि राज्य उत्पादन शुल्क
शिंदे आणि फडणवीस सरकारमधील कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं देण्यात आले आहे. याची सविस्तर माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वात महत्वाची दोन खाती गृह आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत तर नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पाहूयात कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं आहे.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, नगर विकास विभाग
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह
1) राधाकृष्ण विखे पाटील भाजप, महसूल, सहकार
2) सुधीर मुनगंटीवार भाजप, ऊर्जा व वन
3) चंद्रकांत दादा पाटील भाजप, सार्वजनिक बांधकाम
4) विजयकुमार गावित भाजप, आदिवासी
5) गिरीश महाजन भाजप, जलसंपदा
6) गुलाबराव पाटील शिवसेना, पाणी पुरवठा
7) दादासाहेब भुसे शिवसेना, कृषी
8) संजय राठोड शिवसेना, ग्राम विकास
9) सुरेश खाडे भाजप, सामाजिक न्याय
10) संदिपान भुमरे शिवसेना, रोजगार हमी
11) उदय सामंत शिवसेना, उद्योग
12) तानाजी सावंत शिवसेना, उच्च व तंत्र शिक्षण
13) रवींद्र चव्हाण भाजप, गृह निर्माण
14) अब्दुल सत्तार शिवसेना, अल्पसंख्य विभाग
15) दीपक केसरकर शिवसेना, पर्यटन व पर्यावरण
16) अतुल सावे भाजप, सार्वजनिक आरोग्य
17) शंभूराजे देसाई शिवसेना, राज्य उत्पादन शुल्क
18) मंगल प्रभात लोढा भाजप, विधी व न्याय
दरम्यान, मंगळवारी पार पडलेल्या मिनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक दिग्गजांना संधी मिळाली नाही. आता पुढील मंत्रीमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये होणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. त्यावेळी उर्वरित आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी पुढचा नंबर नेमका कोणाचा? यामध्ये कुणाचा नंबर लागणार.. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे..
भाजपकडील आमदार
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
चंद्रशेखर बावनकुळे
विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
संभाजी पाटील निलंगेकर
संजय कुटे
प्रसाद लाड
जयकुमार रावल
देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
माधुरी मिसाळ
जयकुमार गोरे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर
बंटी बांगडिया
एकनाथ शिंदे गट
बच्चू कडू
संजय शिरसाट
भरत गोगावले
राजेंद्र यड्रावकर
प्रकाश अबिटकर
सदा सरवणकर
प्रकाश सुर्वे



