मुंबई – महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत असताना भाजपने त्यांना प्रत्येक गोष्टी जाब विचारायला सुरु केला होता. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. आता भाजप आणि शिंदे गट राज्यात सत्तेत आल्यापासून त्यांच्यावरती विरोधक टीका करीत आहेत. महाराष्ट्रात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. तसेच मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी व पुरग्रस्तांना हेक्टरी 15 हजार रुपये मदत जाहीर केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा डोक्यावर घेतली होती. आता कुणाला डोक्यावर घेणार असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.



