पुणे : बिहारहून तपासासाठी आलेल्या पोलीस शिपाई महिलेने आज (गुरुवारी) दुपारी दीडच्या सुमारास बावधनच्या चांदणी चौकातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
कविता कुमारी (वय 25) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपाई महिलेचे नाव आहे.
बिहार राज्यातील मुजफ्फरपुर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 175/21भा.द.वि कलम 420, 406, 34 मधील आरोपीच्या तपासासाठी आलेल्या तपास पथकामधील महिला पोलीस शिपाई कविता कुमारी (बक्कल नंबर 400) ही आज दुपारी 1.30 च्या सुमारास हॉटेल विवा इन, चांदणी चौक, बावधन येथे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली.




