मुंबई : शिंदे सरकारनं सत्तेत येताच पहिल्यांदा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा केली होती. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल अर्थात एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत दिल्याचं सांगण्यात आलं होतं. पण ही दुप्पट मदत म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच कॅबिनेट बैठक घेतली आणि जाहीर केलं की, एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत अतिवृष्टीग्रस्तधारकांना दिली. पण एनडीआरएफच्या निकषांतील मदत इतकी तुटपुंजी आहे की त्यातून काही भागत नाही. मागं आम्ही सरकारमध्ये असताना एनडीआरएफच्या निकषांच्या तिप्पट मदत केली होती. सरकारनं मोठ्या आवेशात सांगितलं की, आम्ही एनडीआरएफच्या दुप्पट मदत केली पण ही केवळ धुळफेक आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.



