मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत. त्या केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यानंतरही त्या आज फडणवीस यांना भेटायला आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तर आज सकाळी सिंचन घोटाळ्यावरून ट्विटवर ट्विट करून खळबळ उडवून देणारे मोहित कंबोजही सागर बंगल्यावर आले होते. कंबोज आणि रश्मी शुक्ला दोघेही एकाच वेळी सागर बंगल्यावर आल्याने अनेक त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार का? रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चाही या निमित्ताने सुरू झाल्या आहेत.



