मुंबई : मोहीत कंबोज यांनी अलीकडेच सिंचन घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असं विधान त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलं होतं. यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
सोमय्या यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मंत्री असताना स्वत:च्या जावयाच्या जयोस्तुते कंपनीला १५०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला होता. या प्रकरणाची आता लोकायुक्तांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. २४ ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार आहे.



