शरद पवार यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आ. संजय राऊत सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहीत होते म्हणून त्यांना अटक केलं असा आरोप पवारांनी केला. तसेच संजय राऊत यांना करोना काळात औषधांसाठी किती खर्च केला असे प्रश्न विचारले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी (२३ ऑगस्ट) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “सामनाचे संपादक संजय राऊत खासदार आहेत आणि माझ्यासोबत संसदेत बसतात. मागील तीन-चार आठवड्यांपासून त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. का अटक केलं? नबाव मलिक जसे सरकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेसमोर ठेवत होते तसेच संजय राऊत वर्तमानपत्रात लिहीत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात केस करण्यात आली.



