मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमीरा लागलेला आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला, असा सवाल विरोधक करत आले आहेत. असे असताना आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याच रिसॉर्टबाबत मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचा आदेश दिला असून पुढील आठवड्यात ते पाडण्यात येईल, असा दावा सोमय्या यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. आता पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आहे. ते रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार आहेत. पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचे रिसॉर्ट इतिहासजमा होईल,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.



