दिल्लीतील ट्वीन टॉवर कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे अवघ्या काही मिनिटांमध्ये जमीनदोस्त करण्यात आले होते. त्यानंतर आता पुणे-मुंबई हायवेवरील चांदणी चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या कोंडीचा फटका खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील बसला होता. त्यानंतर ही कोंडी तातडीने सोडवण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
चांदणी चौकतील ही वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी चांदणी चौकतील पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिल्लीतील ट्वीन टॉवर पाडणाऱ्या Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. ही कंपनी दिल्लीतील ट्वीन टॉवर पाडण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता त्याचाच वापर चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी करणार असून, अवघ्या 10 सेकंदात येथील पूल जमीनदोस्त होणार आहे.




