पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय लोकांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेत आहेत. मात्र याबरोबरच ते प्रसार माध्यमात या सर्व गोष्टी दाखवल्या जात आहेत. यावरती अजित पवार यांनी मिश्किल शब्दात टीका केली आहे.
आज नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमात असताना अजित पवार म्हणाले की, जो गणेश भक्त आहे त्यांनी अशा पद्धतीने देखावा करण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या मनात ठेवा पण आता काहींना पूर्वी राज कपूर शोमॅन म्हणून ओळखला जायचं.. तशी सवय काहींना आता लागली आहे. जनतेनेच बघावं काय चालले आहे आणि काय नाही… अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कान टोचले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वर्गीय आनंद दिघे यांच्याप्रमाणे आपल्या समर्थकांच्या घरी जाऊन गणेश उत्सवा दरम्यान भेटी घेत असल्याची पुनरावृत्ती करताना दिसत आहेत. मात्र या भेटी घेताना ते आपल्या समर्थक कार्यकर्त्याशिवाय विरोधी पक्षातील राज ठाकरे यांच्या घरी ही जाऊन गणपतीचे दर्शन घेतले याची राज्यात मोठी राजकीय चर्चा झाली. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेचे एकनिष्ठ असणारे मिलिंद नार्वेकर यांच्या ही घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. शिंदे हे अनेक घरगुती व सार्वजनिक गणपती दर्शनाच्या चर्चा सध्या माध्यमांमधून होत आहेत यावरती अजित पवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.



