नगर : हल्ली राजकारणात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. २० जूनपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो. काय एका दिवशी त्यांच्या मनात आलं आणि गेले १५ लोकं घेऊन. काय आता तुम्ही.. हे एकदम ओक्केच झालं.. काय आता बोलायचं?” अशी खोचक टिप्पणी अजित पवारांनी करताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. ते आज नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका कार्यक्रमाचे बोलत होते.
एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतले तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. यचा पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत असताना अजित पवारांनी नगरच्या श्रीगोंद्यात बोलताना त्यावर टोलेबाजी केली. “हल्ली राजकारणात कधी काय घडेल, काही सांगता येत नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.



