मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे ठाकरेंना जमीन दाखवा. भाजपाने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपाचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. त्यानंतर, शिवसेना नेतेही भाजपवर तुटून पडले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमित शहांवर निशाणा साधला.
मुंबई बाळासाहेब ठाकरेंची आहे, हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा आहे. हवेत तर तुम्ही लोकं आहात, तुम्हाला जमीन दाखवली पाहिजे, हे पाप करत आहेत पाप, अमित शहा हे हनुमान भक्त आहेत, आम्ही दोघांनी एकत्र पूजा केली होती, ते विसरले काय, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे. तसेच, मुंबईत आम्ही प्लॅनिंग केलं आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या १५१ जागा निवडून येणार, मी भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने सांगतो, असे भाकीतही खैरे यांनी केले



