मुंबई : राष्ट्रवादीतून भाजपवाशी झालेले आमदार गणेश नाईक हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. अनेक वर्षांपासून गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. या दोन्ही नेत्यांचं एकमेकांशी कधीच जमले नाही. पण आता गणेश नाईक वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने अनेकांच्या भूवया उंचाल्या आहेत.
आज गणेश नाईक वर्षावर एकनाथ शिंदे यांच्याकडे गणरायाच्या दर्शनाला आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आज एकत्र आले आहेत.
काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गट आणि भाजप एकत्र आले पण स्थानिक पातळीवर काही प्रमाणात कुरबुरी सुरु होती. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील शिंदे गटातील नगरसेवक भाजपमध्ये आले.



