मुंबई – मुंबईत गणरायाच्या दर्शनाला आलेल्या अमित शाहा यांनी मुंबई महापालिकेवर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचा भगवा फडकवा, असे आदेश भाजपा नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. शिवसेनेने भाजपाची फसवणूक केलेली आहे, आणि ही फसवणूक सहन करु नका, असा सल्लाही अमित शाहा यांनी भाजपा नेत्यांना दिला.
त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाहा यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला अस्मान दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा एक६ निवडणुका लढवणार असून, त्यांना 150 जागांचे टार्गेट अमित शाहा यांनी दिले आहे. तर शिवसेनेनेही 150 जागांचेच टार्गेट ठेवलेले आहे. शिवसेनेला जमीन दाखवणाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला अस्मान दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर उद्धव यांनी दिले आहे.



