खटाव (सातारा) : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगत आहे. आता भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केलीय. स्वतःच्या पक्षाशी, वरिष्ठ नेत्यांशी, सातारा जिल्ह्याशी आणि इथल्या जनतेशी आयुष्यभर बेईमानी करणारे रामराजे नाईक निंबाळकर सूर्याजी पिसाळांनंतरचे सर्वात थोर गद्दार असल्याचं त्यांनी म्हटल आहे.
ज्या पक्षानं भरभरुन दिलं त्या पक्षाशी आणि त्या पक्षाच्या प्रमुखांशी बेईमानी करायला कधीच मागंपुढं न पाहणार्या रामराजेंची इतिहासात गद्दार म्हणून नक्कीच नोंद होईल, असा टोलाही जयकुमार गोरेंनी लगावला. वाजपेयी यांच्यानंतर भाजपमध्ये आमदार जयकुमार गोरे थोर नेते आहेत, अशी टीका रामराजेंनी केली होती.
त्यावर बोलताना गोरे म्हणाले, छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्वराज्याशी बेईमानी करणारे काही गद्दार होवून गेले. त्यात सूर्याजी पिसाळांचं नाव सर्वात अगोदर घेतलं जातं. यापुढं सूर्याजी पिसाळांनंतर आ. रामराजे यांचं नाव थोर गद्दार म्हणून घेतलं जाईल, असे म्हणाले



