मुबई : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल. यामध्ये मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती मंडळाचा मान पहिला असतो. सर्वप्रथम मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीसाठी बाहेर काढला जातो. त्यानंतर इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले जातात.
#WATCH | Mumbai: Massive crowd gathers amid a procession that's being taken out for the immersion of Lalbaugcha Raja's Ganesh idol pic.twitter.com/wd1xZGfaaa
— ANI (@ANI) September 9, 2022
भाजपा नेते व आमदार प्रविण दरेकर प्रमुख मार्गदर्शक असलेल्या दहिसर, ओवरीपाडा येथील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर, आयोजक प्रकाश दरेकर, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मंडळाचे सचिव सम्राट कदम, दिलीप राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.




