नागपूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत. नुकतीच गडकरींनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा सरकार वरती केलेली टोलेबाजीने उपस्थितांचा एकच हशा मिळवून गेली.
नेमकं झालं काय?
नितीन गडकरींनी नागपूरमध्ये झालेल्या अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना उत्पादन आणि बाजारपेठ यासंदर्भात मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी मालासाठी बाजारपेठेचं गणित कसं जुळवून आणायचं, यावर बोलताना केलेल्या टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.



