मुंबई : शिवसेनेतीळ अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेतच राहणे पसंत केले आहे. त्यांनी शिवसेनेत सुरू असलेल्या गळतीवरून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्हाला देखील खोका, पेटी, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री पदाची ऑफर होती.
मात्र आम्ही शिवसेनेबरोबर प्रतारणा केली नाही. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. सध्या अनेक नेते शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होत आहेत. या नेत्यांना शिंदे गटातून ऑफर मिळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.
काय म्हटलं ओमराजे….
महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून शिंदे गटावर नेत्यांना ऑफर दिल्याचा आरोप होत असतानाच आता शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला देखील खोका, पेटी, कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर होती. मात्र, मी तिकडे गेलो नाही, शिवसेनेसोबत प्रतारणा केली नाही, पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्याचं ओमराजे यांनी म्हटलं आहे.



