मुंबई- दादरमध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात शनिवारी रात्री झालेल्या राड्यात पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी सकाळी शिवसेनेच्या नेत्यांनी दादर पोलीस स्टेशसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यात अनिल परब, अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर हे नेते उपस्थित होते.
त्यानंतर या पाच शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीन मिळालेल्या पाच शिवसैनिकांना सोबत घेऊन विभागप्रमुख महेश सावंत हे मातोश्रीवर गेले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या पाच शिवसैनिकांचं कौतुक केलं आहे.



