मुंबई : नवनीत राणांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. तू ठाकरे असशील तर मीही राणा आहे, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. त्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळी बोलताना त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेकांवर टीका केली. त्यांना माध्यम प्रतिनिधींनी नवनीत राणांविषयी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांना मधूनच तोडत पेडणेकर म्हणाल्या की, मी काहीही बोलणार नाही. १३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलेल्या मुलीवर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही. अशा शब्दात नवनीत राणा यांचा समाचार घेतला.



