नवी दिल्ली : BSNL STV769 सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ने एक नवीन प्लान STV769 लाँच केला असून हा एक फेस्टिव्ह प्लान आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग दिले जात आहे. त्याला फेस्टिव्हल धमाका असे नाव देण्यात आले आहे. हा बीएसएनएलचा खास प्लान आहे, जो दसरा, दिवाळी या फेस्टिव्हल्ससाठी आहे. यात मनोरंजनासह गेमिंगचा आनंद मिळतो. प्लानच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर , हा प्लान Jio आणि Airtel सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांवर भारी पडतो.
BSNL चा STV769 प्लान ७६९ रुपयांचा आहे. त्याची वैधता ९० दिवस आहे. जेथे उर्वरित टेलिकॉम कंपन्या तीन महिन्यांच्या नावाने ८४ दिवसांची वैधता देतात. पण, BSNL च्या या प्लानमध्ये संपूर्ण ९० दिवसांची वैधता दिली जात आहे. ही फेस्टिव्हल ऑफर असली तरी लवकरच याचा आनंद युजर्सना घेता येईल.




