मुंबई : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी, केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचे संवाद साधला यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने पक्षपाणी काम करावे असा सल्ला देताना नाराजी ही व्यक्ती केली यानंतर त्यांनी शिवसेनेचे “चिन्ह गोठवलय पण रक्त पेटवलय” अशा आशयाचे ट्विट करून विरोधकावर मोठा प्रहार केला आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांना पेटून उठण्याचाही संदेश दिला आहे.
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) October 9, 2022
तत्पूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांसाठी आदेश काढला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी, केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची न्यायालयीन लढाई या सारख्या मुद्यांवर पक्षाच्या सैनिकांनी कोणतीही भूमिका मांडू नये, असं राज ठाकरेंची मनसैनिकांना ‘वॉर्निंग’ ठाकरेंनी दिली आहे.
सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर काही बोलू अथवा लिहू नका, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. “सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असं राज ठाकरेंनी म्हटलंय”. त्यामुळं आता जेव्हा राज ठाकरे बोलतील तिचं मनसेची अधिकृत भूमिका असेल ते स्पष्ट झालं आहे.



